समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील ‘त्या’ बारचा परवाना रद्द

मुंबई प्रतिनिधी । एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर   वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द  करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स रद्द केले आहेत.

समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवली होती. बारचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय 21 वर्षे आवश्यक आहे मात्र, असे असतानाही समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना बारचा परवाना मिळाला होता.

नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही पारचा परवाना कशा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा बार परवाना रद्द केला आहे.

Protected Content