मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
वादग्रस्त एनसीबीचे अधिकारी हे एस.सी. प्रवर्गातील आहेत की मुस्लीम ? यावरून मोठ्या प्रमाणात वाद रंगले होते. तत्कालीन मंत्री नवाब मलीक यांनी ते मुस्लीम असल्याचा दावा करून वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात जात पडताळणी समितीतर्फे त्यांची चौकशी सुरू होती. याच चौकशीतून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समितीने समीर वानखेडे हे एस.सी. प्रवर्गातील असून त्यांच्या वडलांनी कधीही मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचे मान्य केले आहे. यामुळे समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.