कुंभारी बुद्रुक येथून संभाजी‍ ब्रिगेडचे पायी आंदोलनाला सुरूवात (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी । जामनेरसह जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी जिल्हा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या नेतृत्वात जामनेर तालुक्यात संभाजी ब्रिगेडतर्फे पायी आंदोलनाला सुरुवात कुंभारी बुद्रुक येथून आज करण्यात आली.

जामनेर सह जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र फक्त पंचनामे झाले अजून एक कवडी सुद्धा शेतकऱ्यांना मदत राज्य शासनाकडून मिळाली नसून यांच्या जाहीर निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे अनोखे पाई आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची सुरुवात आज ६ ऑक्टोबर रोजी पासून कुंभारी येथून करण्यात आली आली आहे.  तोंडापूर, डान्सिंग, ढालगाव किनी, फत्तेपुर मुक्काम राहणार आहे. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन टाकळी, मेहेगाव, निमखेडी, जळांद्री, कासली, तळेगाव, टाकरखेड, ओझर मार्गे आंदोलन जामनेर येथे येऊन तहसीलदार यांना शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी लेखी निवेदन देण्यात येणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संभाजी बिग्रेड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करेल, अशी माहिती प्रतिनिधीशी बोलताना संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे व तालुकाध्यक्ष राम पवार यांनी दिली आहे.

Protected Content