Home क्राईम समता नगरात मालवाहू रिक्षाच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

समता नगरात मालवाहू रिक्षाच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

0
103

जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगरातील जिजाऊमाता चौकात मालवाहू रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्यासुमारास घडली. रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज उर्फ भगवान गोविंदा बाविस्कर (वय-३२) रा. कोळंबा ता. चोपडा ह.मु. समता नगर जळगाव. हा गेल्या सहा महिन्यांपासून जळगावात पत्नी व दोन मुलांसह मालवाहू रिक्षाचा व्यवसाय करण्यासाठी आला होता. आज सकाळी किरकोळ कामासाठी मालवाहू (एमएच १९ एस ७१४२) रिक्षा घेवून गेले. मालवाहू रिक्षात विटा भरून समता नगरातील जिजाऊमाता चौकातील उतरतीवरून येत असतांना अचानक मालवाहूरिक्षाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे युवराज  बाविस्कर यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट समोरच्या घराला धडक दिली. यात युवराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला. अपघातात एकाच्या घराचे वॉलकंपाऊंड पडून नुकसान झाले असून वाहनाचा पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे. 


Protected Content

Play sound