समर्थ कॉलनीत घरफोडी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

chor

जळगाव प्रतिनिधी । शहरातील समर्थ कॉलनीतील एका इमारतीत कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी तीन मजल इमारत पिंजून काढला. मात्र त्यांच्या हातात काहीही न मिळाल्याने तीस हजार रूपये किंमतीचा एलसीडी टिव्ही चोरून नेला. ही घटना 25 एप्रिल दरम्यान सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरी प्रकरणी रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अरूण सिताराम पाटील वय-61 रा. समर्थ कॉलनी, प्रभात चौक हे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कर्मचारी असून मागील वर्षी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या इमारतीत त्याचे मेव्हणे अरूण रघूनाथ महाजन राहतात. अरूण महाजन हे काही कामानिमित्त पुण्यात गेले होते तर अरूण पाटील हे पत्नीसह फोपनार ता.जि.बऱ्हाणपुर येथे लग्नासाठी 22 एप्रिल रोजी गेले. 25 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ते गावाहून परत असल्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. तर त्यांचे मेव्हणे अरूण महाजन यांच्या घराचे कुलूप तोडलेला दिसून आला. अरूण पाटील यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त केल्यानंतर चोरांच्या हाती काहीही मिळाले नाही. त्यांनी घरातील 30 हजार रूपये किंमतीचा एलसीडी टिव्ही आणि 25 रूपयांची चिल्लर चोरून नेली. अरूण पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content