समाजाला धार्मिक कार्यक्रमांची गरज – रोहिणी खडसे

rohini khadase

रावेर प्रतिनिधी । शिवसुत्रानुसार आपले जीवन व्यथित करावे, हाच जीवनाचा खरा मुलमंत्र असुन प्रत्येकाने आपल्या भगवंतावर विश्वास ठेवावा, जीवनातील चढ-उतारातून प्रत्येकाला जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म केल्यास ईश्वर त्याचे फळ योग्य वेळेत देत असतो. म्हणून समाजाला धार्मिक कार्यक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी केले.

प.पू.गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्री यांच्या 9व्या पूण्यतिथीनिमित्त मागील ‘तीन’ दिवसांपासुन तालुक्यातील ओंकारेश्वर येथे रुद्रपूजा, व्याख्यानमाला, व प्रवचन कार्यक्रम घेण्यात येत असून आज समारोपाला रोहिणी खडसे आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच त्यांनी उपस्थित भक्तांना जीवन जगण्याचा उपदेश दिला. सुरुवातील शिवपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे, आमदार शिरीष चौधरी, माजी आ.चंद्रकांत पाटील, माजी सभापती निवृत्ती पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले, चित्रपट निर्माता बाळासाहेब बांगर, अनिल गुंजाळ, पत्रकार धनंजय बोळके, रामनाथ गंभिरे, सागर बोनगिरे, श्रीराम अग्रवाल आणि सहाय्यक पांडुरंग नाफडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

Protected Content