मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रंथालय अधीक्षक प्रा. नरेंद्र सरोदे उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. सरोदे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी महात्मा गांधीजींनी शिकवण दिलेल्या सत्य व अहिंसा तत्वांचा अंगीकार करून सत्याचा व अहिंसेचा पुजारी बना असे आवाहन केले. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान जय किसान’ हा नारा घराघरापर्यंत पोचवून राष्ट्र उभारण्याच्या कार्यात हातभार लावावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ. प्रतिभा ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद तायडे, विनायक राणे, राहुल बोदडे, पंकज खिरोडकर, अजय तायडे, राजश्री वंजारी, साक्षी पाटील चारुशीला सोनवणे, प्रेरणा बोरसे, पुनम मेढे, पूनम दुट्टे, मनीषा गरुड, गणेश शिमरे, विशाल दुट्टे व कृष्णा साळुंखे इत्यादी विद्यार्थ्यांनी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी, प्रास्ताविक प्रा. विजय डांगे आणि आभार राजू जुमळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.