यावल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

यावल तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने प्रतिमा पूजन करून माल्यार्पण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंतीच्या निमित्ताने यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी सोसायटीच्या सभागृह येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा, सविनय या मार्गाने देशाला स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक आंदोलन, सत्याग्रह करुन इंग्रजांना नामोहरम करणारे व त्यांच्या विचारांची प्रेरणा जगातील अनेक पारतंत्र्यातील देशांनी घेऊन इंग्रजांच्या वसाहत वादाविरूद्ध लढा देणारे. तर देशाच्या स्वतंत्र नंतरच्या भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री मुर्ती लहान पण कीर्ती महान असा आपला भारत हा कुषी प्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची क्रांतीकारक कुषी धोरण राबवणारे तसेच आपले सैनिक देशाचे रक्षक आहेत म्हणून जय जवान जय किसान हा नारा देऊन चीनला सुध्दा धुळ चारणाऱ्या देशाच्या या दोघांच्या थोर नेत्यांनी केलेल्या महान कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित काँग्रेस कमेटीचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान, माजी नगरसेवक रसुल शेख गुलाम दस्तगिर,नगरसेवक मनोहर सोनवणे, इम्रान पहेलवान, अमर कोळी, जहीर भाई, यावलकर साहेब, रामचंद्र भोईंटे, अरमान तडवी, संजय भोईंटे, नागो गजरे आदी उपस्थित होते.

Protected Content