चाळीसगाव, प्रतिनिधी | बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा २४ ऑगस्टला दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी चाळीसगाव येथे येणार असल्याची माहिती येथील युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज (दि.२५) एका पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी युवा नेते मंगेश चव्हाण म्हणाले की, चाळीसगावात यावर्षी भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी सुपरस्टार सलमान खान येणार आहे. २३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १५ हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. २४ ऑगस्टला अभिनेते सलमान खान यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते १२ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव, ‘चाळीसगावचा राजा’ त्यात चाळीसगाव येथील ४० रत्नाचा गौरव समारंभ, ३० ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहे. सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून ‘शिवसह्याद्री महानाट्य १७ व १८ रोजी सुमारे ३ हजार कलाकारांचा सहभाग असलेले ‘शिवसह्याद्री महानाट्य’ सलग दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. या महानाटयासाठी विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभणार आहे. सलमान येणार असल्याने यंदा चाळीसगावात दहीहंडी कार्यक्रमाची वेगळीच रंगत असेल. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे.