वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथील एकाने विनपरवाना व मुदतबाह्य किटकनाशकांचे औषधांची विक्री केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात कृषि सेवा केंद्राच्या चालकासह एकुण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील नितीनचंद बंन्सीलाल जैन हा परिसरातील शेतकऱ्यांना साथीदार अतुल लढ्ढा रा. जालना आणि भिलूलाल रामप्रसाद कासट रा. परभणी यांच्या मदतीने मुदतबाह्य व विनापरवाना किटकनाशके विक्री करत असल्याची माहिती जळगाव जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी विजय पवार यांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कारवाई केली. त्यावेळी नितीनचंद जैन यांच्याकडे ५ लाख ८४ हजार ४९५ रूपये किंमतीचे १ हजार ५४९ नग किटकनाशकांचे बाटल्या आढळून आले. त्यानुसार अधिकारी विजय पवार यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात नितीनचंद बंन्सीलाल जैन रा. पिंपळगाव, अतुल लढ्ढा रा. जालना आणि भिलूलाल रामप्रसाद कासट रा. परभणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहे.