अबब : पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईनमध्ये आढळले ४० फुटांचे मूळ !

साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे सुरू असलेल्या जलवाहिन्यांच्या कामात तब्बल ४० फुटांचे झाडाचे मूळ आढळून आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, साकेगावमध्ये सध्या जुन्या जलवाहिन्या (पाईपलाईन) काढून नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. आधीची पाईपलाईन ही खूप जुनी आणि जीर्ण झालेली होती. दरम्यान, आज सकाळी ग्रामपंचायत परिसरात जुनी पाईपलाईन काढली असता यात तब्बल ४० फुटांपेक्षा जास्त लांबीचे पिंपळ वृक्षाचे मूळ आढळून आले.

या भागात असणार्‍या विशालकाय पिंपळ वृक्षाच्या या मुळांमुळे सदर पाईपलाईन ही अक्षरश:चोक-अप झालेली होती. यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या नळाला पाणी येत नव्हते. तथापि, आता हे मूळ काढून टाकल्याने नवीन पाईप लाईनच्या मदतीने या भागात पुर्ण क्षमतेने पाणी येईल अशी शक्यता आहे.

Protected Content