साकळीत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या व गणवेश वाटप

ganvesh vatap

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून शिरागड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव महाजन, विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे, पर्यवेक्षक पी.एस.जोशी, के.के. माळी, डी.एल. चांदणे, वाय.बी.सपकाळे, पालक व पत्रकार गोकुळ कोळी, रूपसिंग बडगुजर यांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतुनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

तसेच शिरागड येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील अनु.जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना सरपंच योगीता सोनवणे, उपसरपंच भारती सोळंके यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रताप सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना सोळंके, रविंद्र कोळी, योगराज सोळंके, सोमा सोळंके, रामकृष्ण सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्र संचलन महेंद्र महाजन यांनी केले तर आभारप्रदर्शन गणेश चव्हाण यांनी मानले आहे.

Protected Content