साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्या दाखल होणार नवीन रुग्णवाहिका

फैजपूर प्रतिनिधी | साकळी तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन वातावरणकुलीत रुग्णवाहिका उद्या दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी गेल्या चार महिन्या आधी आरोग्य विभाग व जळगाव जिल्हा सिव्हिल सर्जन यांना पत्रव्यवहार केले त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून साकळी गावास नवीन रुग्णवाहिक देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी पालकमंत्री मा गुलाबराव पटील यांनी होकार देत आपल्यास लवकरच रुग्णवाहिका मिळणार असल्याचे अश्वासन दिले.

वेळोवेळी या पत्राचा पाठपुरावा करून आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या साकळी गावासाठी नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वा. प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी केले जाणार आहे तरी गावातील सर्व नागरिक बंधू-भगिनी यांनी या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन सभापती रविंद्र पाटील यांनी केले आहे.

Protected Content