यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कै. आण्णासाहेब रामजी महाजन सभागृह, व रंगमंच यांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रगतीशील शेतकरी मधुकर शिंपी हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव महाजन यांच्या अध्यक्षपदाला 33 वर्ष पूर्ण झाली. तसेच उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या उपाध्यक्षपदाला 25 वर्ष पूर्ण तर संचालक व उपाध्यक्ष पदाला 41 वर्ष पुर्ण झाली त्या प्रित्यर्थ शाळेच्यावतीने त्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वसंतराव दयाराम पाटील यांच्या शुभहस्ते कै. आण्णासाहेब रामजी काळू महाजन रंगमंचाचे उद्घाटन केले. तर माजी जि.प.सदस्या विद्याताई महाजन यांच्याहस्ते आण्णासाहेब रामजी काळू महाजन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वसंतदादा महाजन यांच्या प्रतिमेचे अनावरण हाजी रुऊफोद्दीन हाजी शफीयोद्दीन यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेतर्फे व विद्या विकास इंग्लिश मेडियमतर्फे इंग्लिश मेडियम स्कुलचे चेअरमन प्रमोद सोनवणे यांच्याहस्ते अध्यक्ष वसंतराव महाजन, उपाध्यक्ष वसंतराव पाटील या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब वसंतराव रामजी महाजन यांनी 33 वर्षांतील खडतर प्रवासाला कार्याला उजाळा दिला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वसंतराव पाटील यांनी आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगून एका छोट्या रोपांचे महावटवृक्षात कसे रूपांतर झाले व त्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असे भावुक होऊन सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रगतीशील शेतकरी मधुकर शिंपी यांनी संस्थेच्या चढत्या आलेख विषयी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्या कार्याची माहिती देवून गौरव केला. ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण विकसित आलेली एक संस्था असे गौरवोद्गार काढले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे.महाजन, एस.बी.पाटील यांनी केले तर आभार एन.आर. महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.