निलेश धरणगावकरांच्या सेवेत समर्पित – सुरेश चौधरी (व्हिडीओ)

suresh chaudhari

धरणगाव, प्रतिनिधी | मी माझ्या मुलाला समाज सेवेसाठी राजकारणात पाठवले आहे. त्याला धरणगावकरांच्या सेवेत समर्पित केले आहे. त्यांनी मला जे प्रेम गेली २५ वर्षे दिले आहे, तेच प्रेम त्यालाही द्यावे, असे भावनिक आवाहन येथील सध्याचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी यांचे वडील व माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी आज (दि.२६) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केले.

 

सुरेश चौधरी यांचा येथे जीनिंग मिलचा उद्योग असून दोघे पिता-पुत्र हा उद्योग सांभाळतात. ते स्वत: या आधी दोनवेळा येथे नगराध्यक्ष राहिले असून गेल्या २५ वर्षांपासून नगरसेवकही आहेत. माझा मुलगा हा माझ्यासोबत जीनिंग उद्योग सांभाळत असल्याने त्याला पैशांसाठी राजकारणात येण्याची गरज नाही, केवळ समाज कार्यासाठी त्याला मी राजकारणात पाठवत आहे. उद्योग सांभाळतानाही आम्ही शेतकऱ्यांच्या कापसाला कसा जास्तीत जास्त भाव मिळेल, यासाठी प्रयत्न करीत असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

 

 

Protected Content