पुलवामा हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी सज्जाद भट्टला कंठस्नान

Pulwama Attack 710x400xt

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर ज्याच्या गाडीचा वापर करून हल्ला घडविण्यात आला होता. त्या जैश ए मोहम्मदचा कमांडर सज्जाद भट्ट याला आज जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने कंठस्नान घातलंय.

 

अनंतनागमध्ये सज्जाद भट्ट यांच्यासोबत आणखीन एक दहशतवादी ठार झालाय. याच सज्जाद भट्टच्या गाडीचा वापर करून १४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. हा दहशतवादी १७ जून रोजी पुलवामामध्ये सेनेच्या गाडीवर झालेल्या आयईडी स्फोटाचा मास्टरमाईंड होता. सध्या, सुरक्षादलाकडून पुलवामा आणि अनंतनागमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

Protected Content