दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांना ३१ जुलै बुधवार रोजी लष्कराच्या वैद्यकीय सेवांचे महासंचालक बनवण्यात आले. साधना १ ऑगस्टपासून पदभार स्वीकारतील तेव्हा त्या या पदावर असणाऱ्या पहिल्या महिला ठरतील.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हवाई दलात एअर मार्शल पदावर बढती मिळाल्यानंतर साधना यांना हॉस्पिटल सर्व्हिसेसचे महासंचालक बनवण्यात आले. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या साधना या हवाई दलातील दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत.
तत्पूर्वी साधनांना एअर फोर्स ट्रेनिंग कमांड बंगळुरू हेड क्वार्टरमधून दिल्लीला प्रमोशनल ट्रान्सफर देण्यात आले होते. त्यांचे पती केपी नायर हे 2015 मध्ये डीजी ऑफ इन्स्पेक्शन आणि फ्लाइट सेफ्टी या पदावरून निवृत्त झाले. अशाप्रकारे, साधना आणि केपी नायर हे एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणारे देशातील पहिले जोडपे ठरले आहेत.