साने गुरुजी विद्यालयाचे समाधान पाटील यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्ती

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री समाधान पाटील सर यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

समाधान पाटील सर यांनी कामठी (नागपूर) येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये 8 एप्रिल ते 22 मे 2024 असे 45 दिवसाचे निवासी आर्मी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना एनसीसी मधील थर्ड ऑफिसर ही रँक प्राप्त झाली. सदर राष्ट्रीय स्तरातील प्रशिक्षण शिबिरात देशभरातून 517 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर मार्फत श्री. समाधान पाटील यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांची साने गुरुजी विद्यालयात एनसीसी अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.त्यांना 49 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, मुंदडा नगर एक व सोनार नगर येथील सर्व दुनियादारी ग्रुपचे सदस्य यांनीही त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content