अमळनेरातील पाच परमीट रूम्सचे परवाने निलंबीत

अमळनेर प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत अवैध मद्यविक्री केल्या प्रकरणी शहरातील पाच परमीट रूम्स आणि बियर बारचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या ३० एप्रिल २०२० अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या काळात अमळनेरातील संबंधित मद्य विक्री दुकानातून मद्याची चोरट्या पद्धतीने विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी २३ एप्रिल रोजी तपासणी केली होती. यात शहरातील स्टेशन रोड भागातील हॉटेल प्रतिभा, पूनम हॉटेल अँड बियरबार, कुणाल, हॉटेल जनता, हॉटेल प्रतिभा, हॉटेल योगेश आदींंच्या विक्रीत तफावत आढळून आली होती. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी ही दुकाने पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ निलंबित केली आहेत. तर महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये कायमस्वरुपी रद्द का करण्यात येवू नये? याबाबत लेखी खुलासा ८ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Protected Content