Home क्राईम तरूणाच्या बंद घरातून ५० हजारांची रोकड लंपास !

तरूणाच्या बंद घरातून ५० हजारांची रोकड लंपास !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकतीच जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील यश हाईट्स समोरील राजयोग गुरुदत्त नगर भागात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष करून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल गंगाधरराव भेंडे (वय ३८) हे खाजगी नोकरी करतात. त्यांचे घर २६ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० मार्च च्या पहाटे ४:३० वाजेपर्यंत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ५० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले. ३० मार्च रोजी सकाळी ही चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी अमोल भेंडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रवींद्र ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound