रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी सण-उत्सव निमित्त रावेर शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला यावेळी शहराच्या विविध भागांमध्ये रुटमार्च करण्यात आला. 11 फेब्रुवारी रोजी आगामी सण उत्सवाच्या निमित्त सह. पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ यांचे नेतृत्वाखाली रावेर शहरात रावेर पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चौराहा, चावळी, कोतवाल वाडा, थडा भाग, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, राजे शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, मुस्कान पान सेंटर, भोईवाडा, गांधी चौक चौराहा, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अशा संवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले.
पथ संचलनात रावेर पोलिस स्टेशन सपोनि आशिष आडसुळ, सपोनि गणेश धुमाळ ,सपोनि मंगेश गोटला, पोउनि तुषार पाटील, पोउनि दिपाली पाटील, तसेच रावेर पोलिस स्टेशनव २४ पोलिस अंम. एसआरपीएफ चे 20 पोलिस अंम. असे सहभागी होते.