गिरणेला आवर्तन; शेतकऱ्यांना मिळणार 4 तास विजपुरवठा

MSEB

चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा परिसरातील शेतकऱ्यांचा गिरणा नदीला आवर्तन सुटल्यावर पाणीउपसा होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित केला जात होता, त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्यावाचून हाल होत मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत होते. आमदार उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची व होत असलेल्या नुकसानीची दखल घेत वीज वितरण कंपनीचे उप विभागीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून वीजपुरवठा नियमित करण्याच्या सूचना दिल्या.

सुचनेनुसार वीज वितरण प्रशासनाने आज २० मार्च २०१९ पासून आवर्तन संपेपर्यंत दररोज ४ तास वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे गिरणा परिसरातील हजारो शेतकरी व शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजनांना याचा फायदा होणार आहे. यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Add Comment

Protected Content