रोटरी स्टार्सने स्विकारले रिमांडहोमधील 5 अनाथ बलिकांचे पालकत्व

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रोटरी क्‍लब ऑफ जळगाव स्टार्सने बालकल्याण समितीच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात रिमांडहोममधील पाच अनाथ मुलींचे वयाच्या 18 वर्षापर्यंत शिक्षण, संगोपनासह पालकत्व स्विकारले.

आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, सदस्या डॉ.शैलजा चव्हाण, रोटरीच्या सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे, प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगीता पाटील, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, मानद सचिव अश्‍विन मंडोरा, मुलींच्या सुधार गृहाचे सचिव संजय चौधरी, अधिक्षक जयश्री पाटील, मुलांच्या सुधार गृहाचे अधिक्षक डी.पी.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यशस्वीतेसाठी रोटरी स्टार्यचे सागर मुंदडा सचिन बलदवा, योगेश कलंत्री, रोहीत तलरेजा, विपुल पटेल, हितेश सुराणा, पुनीत रावलानी, शुभम मंडोरा, चंदन तोष्णीवाल, जिनल जैन, चिराग शाह, धर्मेश गादिया यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content