मुंबई प्रतिनिधी । सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचा लौकीक घालवल्याबद्दल भाजपला साष्टांग दंडवत घालत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला आदर असून सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
तसेच शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सर्वोच्च न्यायालयावर टीका करत होते. याचा आज सर्वोच्च न्यायालयावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणार्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टीका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
यानंतर पुन्हा काही ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपाला सुनावले आहे, आधी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझाफ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ममेरा अंगण मेरा रणांगण या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केले आहे, अशी टीका करतानाच अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही. अशा शब्दांत सुनावले आहे.
तसेच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरे झाले. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचं मउदात्तफ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना मसाष्टांग दंडवतफ, असेही म्हटले आहे.