बोदवड येथे श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रोहिणी खडसे मैदानात

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र” असा नारा देऊन बोदवड तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती, रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटील यांना तालुक्यातून मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्याचा विजयाचा मार्ग सुकर करा असे आवाहन बोदवड तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान केले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली बोदवड तालुक्यातील साळशिंगी, करंजी, पाचदेवळी, मानमोडी, सुरवाडे, विचवा, गोळेगाव, भानखेडा, मुक्तळ, वाकी या गावांमध्ये प्रचारफेरी काढून श्रीराम पाटील यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या “सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि चुकीच्या धोरणामुळे देशातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक अडचणीत सापडला आहे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे देशात महागाई, बेरोजगारी ,शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न बिकट बनले आहेत. यातून मार्ग काढण्याची आता आपण सर्व सुजाण मतदारांची जबाबदारी आहे त्यासाठी विचारपूर्वक मतदान करा. समाजातील वंचित शोषित घटक, तरुण,महिला कष्टकरी, शेतकरी यांचे हित जोपासणाऱ्या-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन त्यांना निवडून द्या आणि बोदवड तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती, रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटील यांना तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्यासाठीचा विजयाचा मार्ग सुकर करा आणि शरद पवार साहेबांचे हात बळकट करा” असे मतदारांना आवाहन केले.

यावेळी त्यांनी “बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र”हा नारा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटील, रामदास पाटिल, कैलास चौधरी, विजय चौधरी, डॉ ए. एन काजळे, किशोर गायकवाड, गणेश पाटिल, सम्राट पाटील, भरत अप्पा पाटिल, विलास देवकर, प्रविण पाटील, तानाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळू चौधरी, कृष्णा चौधरी निलेश पाटील, सतिष पाटील, डॉ आतिष चौधरी, वंदनाताई पाटील, अश्विनीताई पाटिल, कविता ताई गायकवाड, प्रकाश पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content