मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांचा लुमखेडा, भिलवस्ती, उदळी खु, उदळी बु, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपुर, सुदगाव,मांगी चूनवाडे थोरगव्हाण या गावात मतदार संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. संवाद दौऱ्याच्या सुरुवातीला माजी आमदार स्व आर.आर . पाटील यांच्या दुःखद निधना बद्दल त्यांना श्रद्धांजली वाहुन दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावागावात माता भगिनींनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांनी रोहिणी खडसे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी मतदारांनी रोहिणी खडसे यांना त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. याप्रसंगी मतदारांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांचे निर्माण करण्यात आले. मतदासंघांचा कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, मुलभूत सुविधा असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आ एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण पाटील, राजाराम महाजन, उदय सिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या निवडणुकीत आपल्या “तुतारी वाजवणारा माणूस” या चिंन्हा समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. एकनाथराव खडसे यांनी तापी नदीवर हतनूर, पिंप्री नांदू पुलांची निर्मिती केली त्यामुळे मुक्ताईनगर आणि रावेर तालुके जवळ आले एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालीत काही विकास कामे राहिले असली तरी ते पुर्ण करण्यासाठी रोहिणी खडसे या सक्षम असुन रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी केले.