जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरातून अखेर रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
गत काही दिवसांपासून लागून असणारा सस्पेन्स दूर होत आज त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांना तिकिट मिळणार की नाही याबाबत संभ्रम सुरू होता. यातच भाजपच्या पहिल्या तिन्ही याद्यांमध्ये त्यांचे नाव नसल्याचे खडसे समर्थक संतप्त झाले होते. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी भाजपने चौथी यादी जाहीर केली असून यात मुक्ताईनगरातून त्यांची कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता खडसे यांचा बंडाचा पवित्रा शमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)