रोहिणी खडसे यांना आवरता आला नाही आजीबाईंच्या ओव्या ऐकण्याचा मोह

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पुर्वी लग्न कार्यात एकत्र येऊन लग्नघरची कामे केली जायची. शहरी भागात आजकाल जेवणावळी मंडप व इतर कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केले जात असले तरी ग्रामीण भागात अजुनही एकत्रित येऊन कामे केली जातात यावेळी एकत्रित आलेल्या स्त्रिया आपल्या विरंगुळ्यासाठी आपल्या बोलीभाषेत गाणे ओव्या म्हणतात. मुक्ताईनगर-बोदवड परिसरात सध्या सोशल मीडिया वर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असुन हा व्हिडीओ एका लग्नघरचा असुन यात स्त्रिया एका ठिकाणी बसुन आपले कामे करत आहेत त्यात एक आजीबाई आपल्या सुमधुर आवाजात ओव्या गात असुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या त्या आजीबाई जवळ बसुन त्या ओव्या ऐकत आहेत व उपस्थित महिलांशी संवाद साधत आहेत. या व्हिडीओ बद्दल रोहिणी खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्याग्रामिण भागात पुर्वी लग्न सोहळे आठ आठ दिवस चालायचे सर्व भाऊबंद,अनातेवाईक, शेजारी, गावकरी एकत्र येऊन लग्न घरचे कामे वाटून घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात कामे पार पाडायची प्रत्येक दिवशी रिती रिवाज प्रथेनुसार एक एक विधी पार पाडला जायचा यामध्ये मांडव घालणे, रुखवत बनवणे,दळण दळणे,हळद दळणे ,इ कामांचा समावेश असायचा हे कामे करत असताना एकत्रित जमलेल्या महिला या आपल्या बोलीभाषेत लोकगीते, ओव्या म्हणायच्या.

या लोकगीत ओव्यांमध्ये महिला लग्न समारंभातील प्रसंग,आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग, कामे ,सुख दुःख आनंद ,प्रेम विरह या घटनांचे, नात्याचे वर्णन, समाज प्रबोधन आपल्या ग्रामिण पण ऐकायला गोड सुमधुर बोलीभाषेतून करायच्या, त्या गायला लागल्या, की तो त्यांचा जणू छंदच बनायचा. सादाला प्रतिसाद मिळाल्याप्रमाणे एकीनंतर दुसरी महिला गायला लागायची.यातून एकप्रकारचा आनंद तर मिळायचाच पण काम करताना थकवा न येता उत्साह यायचा. आजच्या व्यस्त व धावपळीच्या जीवनात या गोष्टी लोप पावत असल्या तरी ग्रामिण भागात लग्न घरी लोक एकत्र जमतात लग्नघरची कामे एकमेकांच्या सहकार्याने खेळीमेळीने पार पाडतात मतदार संघातील बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे श्री. बाळू भाऊ पाटील यांची कन्या चि .सौ .का प्रितीच्या लग्नाच्या हळद समारंभास गेले असताना लग्नघरी महिला एकत्रित बसुन कामे करत असल्याचे व एक आजीबाई आपल्या सुमधुर आवाजात ओव्या गात असल्याचे दिसून आले. यावेळी आजीबाईं जवळ जाऊन ओव्या ऐकण्याचा मोह आवरता आला नाही म्हणुन मग आजी बाई जवळ बसुन आजींच्या सुमधुर आवाजातील ओव्या श्रवण केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. रोहिणी खडसे या नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्या पदाचा बडेजाव न करता लहानांपासुन मोठ्यां पर्यंत सर्वांशी आपुलकीने संवाद साधताना दिसुन येतात ही घटना दहा दिवसांपूर्वी ची असली तरी आता हा आजीबाईंच्या ओव्या ऐकतानाचा व्हिडीओ परिसरात सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

Protected Content