मुक्ताईनगर प्रतिनिधी । कुऱ्हा काकोडा येथील लक्ष्मीनारायण चौधरी आश्रमशाळा येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. तोडसाम आणि डॉ. बाठे यांच्याकडून कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली.
जिल्हा बँकच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी ,रुग्ण यांना सॅनिटायझर,मास्क उपलब्ध करून दिले. कुऱ्हा परिसरातील नागरीकांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या पाठपुराव्याने कुऱ्हा येथील कोविड सेंटरला मंजुरी मिळाल्याबद्दल आणि रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी ३० बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच रोहिणीताई खडसे खेवलकर यांना निवेदन देऊन कुऱ्हा कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी लवकरच पाच ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सरचिटणीस रविंद्र दांडगे, विशाल महाराज खोले,काकोडा सरपंच तुळशीराम कांबळे, पोलीस पाटील विजय पाटील,अनंत पाटील, रमेशसेठ खंडेलवाल,पवन पाटील, रविंद्र पाटील, संतोष कांडेलकर, अनंत कांडेलकर, वाल्मिक भोलानकर, कचरू बढे, मुन्ना बोडे, शंकर मोरे ,सुशिल भुते, मितेश राठोड, रुपेश माहुरकर, आणि पदाधिकारी उपस्थित होते.