जळगाव प्रतिनिधी । धारदार शस्त्र दाखवून व्यापाऱ्याकडून सोने व रोकड लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला उमाळा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अजय सुदाम भिल (वय 22) रा.नशिराबाद रोड उमाळा ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुह्यात व्यापाऱ्याला मारहाण करून सोने व रोकड लुटल्याची घटन घडली होती. गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी हा उमाळा गावात आलेत आल्याची गोपनिय माहिती आज मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून संशयित आरोपीला अटक करणे कामी रवाना केले. पोहेकॉ प्रदीप पाटील, जयंत चौधरी, विजय पाटील पंकज शिंदे यांनी आज सकाळी गावात जाऊन सापडत असून संशयित आरोपी अजय भिल याला अटक केली आहे. दरम्यान जिगर बोंडारे या सराईत गुन्हेगार यांच्यामधील सदस्य असल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी यामुळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.