भुसावळ प्रतिनिधी | जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीसाठी भुसावळ पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या एन.एस.एस या विभागातर्फे कार्यसंस्कृती अभियानाअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा. देवेंद्र पाटील यांनी, “जगात एड्सग्रस्तांची प्रचंड प्रमाणात वाढणारी आकडेवारी अतिशय चिंताजनक असल्याचं सांगून रोगाचा वायरस शरीरात पसरल्यानंतर तो शरीरावर कसा दुष्परिणाम करतो, त्याचे शरीरावर कसे विपरीत परिणाम होतात हे पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य उत्तम सुरवाडे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून राज्यस्तरावर जनजागृती करणारे जळगाव येथील डॉ.भागवत महाजन होते. त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर अतिथी म्हणून पर्यवेक्षिका शोभा तळेले, कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा.राजेंद्र खेडकर, प्रा.स्वाती पाटील, प्रा.टी एस सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री भंगाळे यांनी तर सूत्रसंचालन आर पी मसाने यांनी केले. आभार प्रा महेश सरोदे यांनी मानले. प्रा.जे.डी धांडे, प्रा एस बी राजपूत, प्रा व्हि डी सावकारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी या सर्वांनी परिश्रम घेतले.