लवकरच विवाहबद्ध होणार ‘दंगल गर्ल’

babita

नवी दिल्ली प्रतिनिधी । ‘दंगल गर्ल’ अर्थात कुस्तीपटू बबिता फोगट हिच्या जीवनात आता नवे वळण येणार आहे. भाजपच्या साथीने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारी बबिता येत्या काही दिवसांमध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे.

रविवारी गीताने दादरी येथील भाजप पक्ष कार्लायलयात कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्याचवेळी तिने ही अत्यंत महत्त्वाची बाब समोर ठेवली. ‘जीवनात मी एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची मला गरज आहे. तुम्ही सर्वजण माझ्या लग्नासाठी आमंत्रित आहात’, असे बबिता म्हणाली. आपल्या या नात्याविषयी फार गोष्टी उघड न करता, मुळच्या नजफगढ येथे राहणाऱ्या विवेक सुहाग याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. विवेक हासुद्धा कुस्तीच्या खेळात सक्रीय आहे. विवेकला पहिल्यांदा २०१४ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेटल्याचं तिने सांगितलं. पहिल्या भेटीनंतर जवळपास पाच वर्षे हे नातं आकारास आणल्यानंतर त्यांनी यंदाच्या वर्षी जून महिन्यात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. येत्या १ डिसेंबरला चरखी दादरी येथील बलाली या गावी हरयाणवी पद्धतींनुसार हा विवाहसोहळा पार पडेल. ज्यानंतर २ डिसेंबरला दिल्लीमध्ये एका दिमाखदार स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

Protected Content