Home Cities धरणगाव मंत्री महोदयांची रिक्षा स्वारी…भलतीच भारी ! ( व्हिडीओ )

मंत्री महोदयांची रिक्षा स्वारी…भलतीच भारी ! ( व्हिडीओ )

0
72

धरणगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज चक्क रिक्षातून मतदान केंद्र गाठल्यामुळे गावातील नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी पाळधी येथे मतदान केले. एरव्ही आपल्या समर्थकांसह वाहनातून मतदानासाठी येणार्‍या ना. पाटील यांनी आज चक्क रिक्षात बसून मतदान केंद्र गाठले. यामुळे उपस्थित मतदारांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अर्थात, मंत्री होऊनही गुलाबभाऊ यांचे पाय जमीनवरच असल्याची प्रतिक्रियादेखील यातून उमटली.

पहा : गुलाबराव पाटील यांचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound