Home क्राईम हुडकोत प्रवासी रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न

हुडकोत प्रवासी रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न


riksha jalali

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको परीसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाची रिक्षाला मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या लक्षात असल्याने वेळीच आग विझविण्यात आली. याबाबत अज्ञात समाजकंटकांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अलीम खान सलीम खान वय 21, रा. पिंप्राळ हुडको हा रिक्षा चालक असून गेल्या पाच वर्षांपासून आहे. दररोजप्रमाणे 30 एप्रिल रोजी सायंकाळी रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 7599) चालवून घरी आला. रिक्षा चालविल्यानंतर रात्री जेवन करून कुटुंबियांसह झोपले. पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी रिक्षावर पेट्रोल व रॉकेल टाकून आग लावून दिल्याचा प्रकार घडला. मात्र यावेळी शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. लगेचच अलीम खानच्या कुटुंबियांनी घरातील पाण्याच्या बादल्या आणून आग विझविली. अवघ्या 10 मिनीटात ही आग विझविण्यात आल्याने रिक्षाचा टप, सिट जळाले बाकी रिक्षाचे कोणतेही नुकसान झाले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound