यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमे निमित्ताने येथील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरुचरणी लीन होण्यासाठी बुधवारी दिवसभर गुरु भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता.
कोरोना संसर्गाचा मागील काळ वगळता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येथील प्रसिद्ध महर्षी व्यास, मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी पुणे येथील सौरभ अजनाडकर, अमृता अजनाडकर, तालुक्यातील मोराळे येथील सरपंच नंदा महाजन, गोपाळ महाजन, धानोरा तालुका चोपडा येथील संतोष पाटील, उर्मिला पाटील, ऐनपुर तालुका रावेर येथील पंकज महाजन, कोमल महाजन व यावल येथील नितीन कुलकर्णी, सीमा कुलकर्णी या पाच दांपत्यांचे हस्ते ११ ब्रह्म वृंदाचे मंत्रोच्चारात महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली.
याप्रसंगी पवित्र मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमला होता. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन येथील तहसीलदार महेश पवार यांची हस्ते करण्यात आले. तसेच मंदिरा आवारात येथील मुख्याधिकारी मनोज म्हसे यांचे हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
महाप्रसाद –
दर्शनानंतर भाविकांना वाटप करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने तांदुळाचा भात आणि बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
दिंड्यांचे आगमन –
दिवसभरात तालुक्यातील दहिगाव, विरवली, चौखेडाची चितोडा, कठोरा, बोरावल, सांगवी खुर्द, सातोद, कोळवद, वडरी, कोरपावली, राजोरा येथून पायी दिंड्या आल्या होत्या.
दिवसभर भाविकांची रीघ –
शहरात दिवसभर पावस सुरु असतांनाही भाविकांची दर्शनासाठी रीघ कायम होती.
सहकार्य –
उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ सामाजिक संस्था शहरातील स्वयंसेवक व मंदिर समितीच्या वतीने उत्सव यशस्वीपणे पार पडला. पो.नी.दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार विनोद खांडबहाले आले व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जनार्दन स्वामी मंदिर, साईबाबा मंदिर, श्री संत गजानन महाराज मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/901882100769757