जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील फळ, भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ३ चाकी,बॅटरीवर चालणारी,फळ/ भाजीपाला विक्रीसाठी शेल्फ सह,तयार रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार असून विक्रेत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
विक्रेते हे कष्टाने फळ/भाजीपाला विक्री करीता लोटगाडी,सायकल,किंवा डोक्यावर टोपले घेऊन व्यवसाय करता आहात. त्यामुळे थकवा येऊन विक्रीवर त्याचा परिणाम होतो. याचा विचार करून मराठी प्रतिष्ठान विक्रेत्यांना व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी आरटीओ मान्यताप्राप्त बॅटरी रिक्षा ला १००% टक्के अर्थ सहाय्य घेऊन देण्यात मदत करण्यासाठी मदत करणार आहे. फळ/भाजीपाला व्यवसाय घाम न गाळता करा..आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा असे आवाहन मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. या योजनेला सहकार्य करण्यासाठी अतुल शक्ती कंपनी.चे वितरक विद्याधर नेमाणे हे तत्पर असल्याचे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.