Home Cities चोपडा डांभुर्णीजवळ रिक्षा पलटी ; ७ शेतमजूर जखमी

डांभुर्णीजवळ रिक्षा पलटी ; ७ शेतमजूर जखमी


accident5 201905244186
 

जळगाव प्रतिनिधी | शेताच्या कामांसाठी किनगावहून ममुराबादला रिक्षाने जात असताना रिक्षा चालकाच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा पलटी होऊन 7 मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शेतात कामासाठी किनगाव होऊन ममुराबादकडे रिक्षाने नुरजहा लालखा तडवी (वय 45) भुगाबाई रेहमत तडवी (वय 45), जरीना रहमत तडवी वय 20 अभिदाबाई बहादूर तडवी (वय 40), नथाबाई जहांगिर तडवी (वय 45) आणि रिक्षा चालक रसिद हबीब तडवी (वय 25, सर्व रा. किनगाव ता. यावल) हे सर्व मजूर जात असताना किनगाव आणि डांभुर्णीच्या दरम्यान रिक्षाच्या हँडलवर ठेवलेला मोबाइल रिक्षाचालकाच्या पायाजवळ पडला. मोबाईलला उचलण्यासाठी वाकताच चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन सर्व मजूर जखमी झाले. जखमींना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या रिक्षात एकूण ११ मजूर बसलेले होते यापैकी ७ जणांना गंभीर दुखापत झालेली आहे.


Protected Content

Play sound