भुसावळ मराठा समाज मंडळातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा (व्हिडीओ)

bhusaval nivedan

भुसावळ प्रतिनिधी । घोडसगांव ता. मुक्ताईनगर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी मराठा समाज मंडळ शहर व तालुक्याच्यावतीने उपविभागीय अधिका-यांना निवदेन देण्यात आले आहे. यावर लवकर ठोस पाऊल न उचल्यास महाराष्ट्रभर उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मुलगी घरी एकटी असतांना तिचे एकटेपणाचा फायदा घेवून ४५ वर्षीय वासनांध नराधमाने त्या मुलीचा बलात्कार केला. या आरोपी अटक असून त्याने केलेला गुन्हा माणुसकीला काळीमा फासणार आहे. कोपर्डीची घडलेली घटना ताजी असतांना महाराष्ट्रात वारंवार वासनांध नराधमान कडून अशा प्रकारच्या घटना दररोज घडत आहेत. अशा निर्दयी लोकांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजात अशा घटना घडणार नाही, म्हणून या आरोपीची केस ही जलदगती न्यायालयात चालवून त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळावी. अशी मागणी निवेदनाद्वारे मराठा समाज मंडळ शहर व तालुक्याचे अध्यक्ष किरण पाटील व सचिव प्रमोद पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. निवेदन देतांना किरण पाटील, प्रमोद पाटील, मा. सभापती राजेंद्र चौधरी, हर्षल रंधे, नगरसेवक मुकेश गुंजाळ व तुषार पाटिल आदी उपस्थितीत होते.

Protected Content