हरीविठ्ठल येथील रिक्षाचालकाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । हरिविठ्ठल नगर परिसरातील रहिवासी ३६ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रतिलाल कृष्णा जाधव (वय-३६) रा. हरीविठ्ठल नगर असे मयत तरूणाचे नाव आहे. सावखेडा शिवारात गिरणा पंपींग रेाडवरील रेल्वेपूला जवळ अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यु झाल्याची माहिती तालूका पेालिसांना मिळाली होती. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे यांच्यासह तालूका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करतांना मयत तरुणाच्याखिश्‍यातील पाकीटा वरुन त्याची ओळख पटली. ग्रामसेवक संघटनेचे रामभाऊ पाटिल, विजय पाटिल यांनी संघटनेची ॲम्बुलन्स उपलब्ध करुन देत पेालिसांना घटनास्थळावर मदतही केली. हरिविठ्ठल नगरातील नगरसेवकांना संपर्क केल्यावर रतिलाल कृष्णा जाधव (वय-३६,रा. हरिविठ्ठल नगर) यांच्या कुटूंबीना फोन करुन पेालिसांनी माहिती देण्यात आली.  नातवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह पाहताच कुटूंबीयांनी एकच हंबरडा फोडला. रतिलाला यांच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ पंकज, पत्नी जान्हवी, मुलगा रितेश (वय-८), दोन बहीणी असा परिवार आहे.

 

Protected Content