जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून लाकडी धोपटण्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन राजू राठोड वय ३२ रा. रायपुर फाटा, कुसुंबा ता. जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रिक्षा चालवून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता सुप्रीम कॉलनी येथे रिक्षा घेवून उभे होते. त्यावेळी मोहित जयसिंग बागडे रा. सिंधी कॉलनी जळगाव याने हुज्जत घातली. आणि शिवीगाळ करत सचिन राठोड याला लाकडी धोपटण्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सचिन राठोड याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मोहित बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.




