Home Cities अमळनेर कचरा टाकण्यावरून एकाला शिवीगाळ व बेदम मारहाण

कचरा टाकण्यावरून एकाला शिवीगाळ व बेदम मारहाण

0
152


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द गावातील रस्त्यावर कचरा टाकण्याच्या कारणावरून शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील नगाव येथे अजित हिम्मतराव बोरसे वय ४५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी ३ जानेवारी रोजद दुपारी १२ वाजता ते शेतात जात असतांना त्यांचा चुलत भाऊ मयुर अनिल बोरसे याने कचरा टाकण्याच्या कारणावरून अजित बोरसे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने डोक्यावर आणि नाकावर वार केल्याने गंभीर जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत त्यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound