अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बोरी नदीच्या काठाहून रिक्षातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका तरूणावर अमळनेर पोलीसांनी सोमवारी २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरात धुलीवंदन बंदोबस्त निमित्त अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमवारी २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पेट्रोलिंग करत असतांना बोरी नदीच्या काठाजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करतांना रिक्षा आढळून आली. वाळू वाहतूकीबाबत चौकशी केली असता चालक साहिल खान मोहम्मद आरीफ खान वय २४ आणि मालक आकाश सुभाष शिंपी रा. अमळनेर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीसांनी वाळूने भरलेली रिक्षात जप्त केली. याप्रकरणी सकाळी ११ वाता पोहेकॉ अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक साहिल खान मोहम्मद आरीफ खान वय २४ आणि मालक आकाश सुभाष शिंपी रा. अमळनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.