शेतात महावितरण कंपनीचे सिमेंटचा पोल आणि तारांची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खरजई शिवारातील शेतातून महावितरण कंपनीचा सिमेंटचा खांब आणि अल्युमिनीअमच्या तारांचे बंडल असा एकुण ५२ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खरजई शिवारातील गिरधर मुलमुले यांच्या शेतापासून ते किशोर मुलमुले यांच्या शेताच्या दरम्यान महावितरण कंपनीच्या मालकीचे विद्यूत तार आणि सिमेंटचा पोल ठेवण्यात आला होता. शनिवार २३ मार्च रोजी सायंकाळी ६ ते २४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ५२ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनिष चव्हाण यांनी याबाबत सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश बेलदार हे करीत आहे.

Protected Content