रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला अटक होणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडा यांना एनसीबीकडून अटक केली जाणार आहे. काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे,

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. अखेर आता शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली जाणार आहे. काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे.

याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत.

Protected Content