आढावा बैठकीत स्थायी सभापतीद्वारे अधिकाऱ्यांची झाडाझडती (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 31 at 7.19.02 PM

जळगाव, प्रतिनिधी | स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सर्व विभागप्रमुखांचा कामकाजाबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी उपयुक्त मिनिनाथ दंडवते, उपायुक्त मुठे, नगरसचिव गोराणे  उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सभापती मराठे यांनी अधिकाऱ्यांंची झाडाझडती घेतली.

 

 बैठकीत विद्युत विभागातर्फे संथ गतीने कामकाज होत आसल्याने सभापती मराठे यांनी नाराजी व्यक्त केली. विभाग प्रमुख सुशील साळुखे यांना शहरात बहुतेक ठिकाणी लाईट बंद अवस्थेत आहेत याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. शहरात त्वरीत लाईट लावण्यात यावेत अशा सूचना त्यांनी साळुखे यांना दिल्यात. तांत्रिक कारणाने वाहन विभागाचा फायर फायटरचा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात यावा लागत असल्याने सभापती यांनी रोष व्यक्त केला. वाहन विभागात २ नवीन जेसीबी, १ जुने जेसीबी आहे. वाहनांची दुरूस्ती लवकर होत नसल्याने अधिकारी व सभापतींनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्ते खराब झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष असतांना मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याची टेंडर काढूनही कामे अद्यापही सुरु का झाले नाहीत याची विचारणा सभापती मराठे यांनी केली. याला उत्तर देतांना बांधकाम अभियंता एस. एस. भोळे यांनी महाबळ, रामानंद नगर भागात अद्याप रस्त्यांची कामे नाहीत, ही कामे प्रस्तावित आहेत. याबाबत लवकरच रस्त्यांची कामे होतील असे सांगितले. तसेच कोर्ट चौक, नेरी नाका, रथ चौक, डी मार्ट येथे काँक्रिटीकरण होईलअसेही भोळे यांनी यावेळी सांगितले. भांडारपाल बाळू भामरे यांच्याकडे विविध विभागातून साधनसामग्रीची मागणी करण्यात येत असते. मात्र, त्या मागणीची पूर्तता भांडारपाल विभागाकडून का केली जात नाही याबाबत सभापती मराठे यांनी विचारणा केली. भामरे यांची कार्यशैली बघता भांडारपाल बदलाचे संकेत मराठे यांनी दिलेत. महापालिकेतर्फे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात दिरंगाई होत असल्याने क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे यांना मराठे यांनी धारेवर धरले. एकमुस्त ठेक्याअंतर्गत ट्रॅक्टर कचरा उचलण्यासाठी अपुरे पडत असल्याने अनेक भागात कचरा अद्यापही पडून आहे. कोणत्या वार्डात किती वाहनांची मागणी आहे व तेथे किती वाहने पाठवली याचा आढावा घेण्यात आला याप्रकरणी डॉ. विकास पाटील यांनी माहिती दिली. वैयक्तिक शौचालये ८ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. काही शौचालये पूर्ण झाली आहेत तर काहीं लाभार्थ्यांकडून १हजार ५०० रुपयांची मागणी मनपा अधिकारी करीत असल्याच्याही तक्रारी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लाभार्थ्याकडून पैशांची मागणी करणाऱ्यां याबाबत तपास केला जाईल असे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले. यासह इतर सर्वच विभागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात काही ना काही उणीवा आहेत, त्रुटी आहे. यात मनपा अधिकारी, विभाग प्रमुखांचीच उदासीनता दिसून येत असल्याचे उघड झाल्याने उपायुक्त व सभापतींनी नाराजी व्यक्त केली.

Protected Content