Home क्राईम महसूल पथकाची धडक कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

महसूल पथकाची धडक कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रसलपूर येथे विनापरवाना सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक तलाठी पथकाने पकडली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाळू माफियांमध्ये धडकी भरली आहे. खिरवड येथून तामसवाडी मार्गे रावेर आणि के-हाळा परिसरातही होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गेल्या काही काळापासून रावेर तालुक्यात तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू वाहतुकीवर सातत्याने कारवाई होत आहे. मात्र, काही तलाठी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. परंतु, आता तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत स्वतः पुढाकार घेत तलाठी पथकाने ही कारवाई केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तलाठी स्वप्निल परदेशी, प्रशांत जाधव, सुधीर इंगळे, कैलास चव्हाण आणि कोतवाल गणेश चौधरी यांच्या पथकाने रसलपूर परिसरात अचानक छापा टाकत अवैध वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. अनेक वर्षांनंतर तलाठी स्तरावर थेट कारवाई झाल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, भविष्यात अशा कारवाया वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound