यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील वैज्ञानिक अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले नानासाहेब शंकर घोडके हे आपल्या प्रर्दीघ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप संमारंभात त्यांना सपत्नीक निरोप देण्यात आला.
यावलच्या पद्दमावती लॉन, धनश्री चित्र मंदिर यावल येथे संपन्न झाला. यावल ग्रामीण रूग्णालयात शासकीय अधिकारी म्हणुन सामाजिक बांधीलकीतुन उत्कृष्ट व निस्वार्थ अशी आपली सेवा बजावणारे प्रयोगशाळा वैज्ञानिक नानासाहेब शंकर घोडके यांना त्यांच्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. नानासाहेब यांनी आपली प्रशासकीय सेवा १९९२ नवापुर जिल्हा धुळे या ठीकाणाहुन केली त्यानंतर त्यांनी १९९५ ससुन रूग्णालय पुणे, १९९६ मुक्ताईनगर जिल्हा जळगाव व त्यानंतर वर्ष-१९९९ यावल पासुन सलग २४ वर्ष त्यांनी यावल व न्हावी रुग्णालयात आपली सेवा बजावली.
अशा निस्वार्थ व सेवाभावी वृत्तीने आपली प्रशासकीय सेवा देणारे अधिकारी नानासाहेब घोडके यांना माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, यावलचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील, यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. संध्या सोनवणे, धंनजय शिरीष चौधरी, यावलचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले, कॉंग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष कदीर खान, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड, राष्ट्रवादीचे नाना बोदडे,वढोदे येथील सरपंच संदीप सोनवणे ,भगतसिंग पाटील,डॉ. विजय कुरकुरे , डॉ तुषार सोनवणे, यावलच्या निरामय प्रसुती रूग्णालयाचे डॉ शंतनु देशपांडे, डॉ.प्रशांत जावळे यांच्यासह मोठा मित्रपरिवार व त्यांचे सह कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांचा सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला.