जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तहसील कार्यालय आणि पिंप्राळा तलाठी कार्यालयाच्या वतीने ऍग्री स्टॅक फार्मर आयडी शिबीराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या एकदिवसीय कॅम्पमध्ये २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी तयार करून घेतले, आणि योजनेचा लाभ घेतला.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार राहूल वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना तहसीलदार शितल राजपूत यांनी यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतसंबंधित सर्व योजना लाभ मिळवण्यासाठी आणि शासकीय मदतीचा उपयोग करण्यासाठी फार्मर आयडी त्वरीत तयार करून घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीतसाठी पिंप्राळा तलाठा कार्यालयातील तलाठी राजू बाऱ्हे, मंडळाधिकारी भाऊसाहेब मारूडे, सहाय्यक तलाठी मालती चाफले, रवीना पवार, कोतवाल राजेश वराडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. तर शिबीरात आराध्या महा ई सेवा केंद्राचे संचालक आणि सदस्य, यामध्ये अमोल पढार, शेखर पढार, प्रेम बुंदे, अली शेख, प्रशांत पोतदार, शमीर तडवी, दीपक देवरे, संकेत कोल्हे, दर्शन खैरनार, निलेश बडगुजर, धनराज ब्राह्मणे, विशाल धनजे यांनीदेखील सहकार्य केले.
ऍग्री स्टॅक फार्मर आयडी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित योजनांची माहिती, आर्थिक मदत आणि अन्य शासकीय लाभ सहज उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पिंप्राळा येथील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार शीतल राजपूत यांनी शेतकऱ्यांना शेतसंबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.