भारताला जशास तसे उत्तर देऊ; पाकिस्तानची धमकी

इस्लामाबाद (वृत्तसेवा) भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही भारताला भारताला जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली आहे.

 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारताला या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, भारताने पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने एलओसीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल आत्मसंरक्षणासाठी कारवाई करण्याचा अधिकार आहे. मी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहे आणि परराष्ट्र मंत्र्यांचे मत त्यांच्यासमोर मांडणार आहे. पाकिस्तानने या मुद्द्यावर जगभरातील अनेक देशांशी चर्चा केली आहे. पाकिस्तानचे सैनिक भारताच्या कारवाईचे उत्तर देण्यासाठी तयार आहेत.

Add Comment

Protected Content