Home Cities यावल यावल बाजार समिती सभापती व उपसभापतींचा राजीनामा ; उमेश पाटील व पंकज...

यावल बाजार समिती सभापती व उपसभापतींचा राजीनामा ; उमेश पाटील व पंकज चौधरी यांना संधीची शक्यता !

0
8

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उज्जैनसिंग राजपुत व उपसभापती दिपक चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर नुतन सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील यांची व उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांची वर्णी लागणार असल्याचे चर्चा आहे असे असले तरी पक्षा अंतर्गत होणाऱ्या बैठकीत अंतीम निर्णय होणार आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक मंडळाच्या सर्वातुमते अंतर्गत ठरलेल्या विषयाअनुसार सभापती व उपसभापती पदासाठी निवड करण्यात येणार आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असुन,महायुतीच्या ठरलेल्या प्रमाणे सर्वांना सभापतीपदाचा सन्मान मिळण्याची समान संधी मिळावी या दृष्ठीकोणातुन विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपुत व उपसभापती दिपक दिनकर चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, दिनांक ४ नॉव्हेबर रोजी सभागृहात नविन सभापती व उपसभापती यांची निवड होणार आहे. उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उद्या दिनांक ४ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत भारतीय जनता पक्षाचे संचालक म्हणुन निवडून आलेले उमेश प्रभाकर पाटील यांची व उपसभापती पदासाठी भाजपाचेच संचालकपदी निवडून आलेले पंकज दिनकर चौधरी यांचे नांव अग्रभागी असल्याची चर्चा आहे. यासोबत, सागर राजेंद्र महाजन व सौ कांचन ताराचंद फालक यांच्या नांवाची देखील चर्चा असुन,आज संध्याकाळी होणाऱ्या आमदार अमोलदादा जावळे आणि पक्षातील पदधिकारी व संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत सभापती व उपसभापतीच्या नांवावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते.


Protected Content

Play sound